थोडे आमच्या बद्दल
सर्व मराठीजनांचे गुढीपाडवा.कॉम मध्ये स्वागत.
गुढीपाडवा हा सण आपण गेली अनेक शतके साजरा करत आलो आहोत.
महाराष्ट्राचे महान योद्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या विजयानंतर सर्वप्रथम गुढीपाडवा साजरा करण्यास सुरुवात केली.....वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या शोभायात्रेचे आयोजन
करून गुढीपाडवा ह्या सणाला सामाजिक स्वरूप दिले.
आज अनेक ठिकाणी शोभायात्रांचे
आयोजन होतो, त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने आपला तरुण वर्ग सहभागी होतो.
पण, त्यातील किती जणांना माहित असते कि "आपण गुढी का उभारतो?" किवां
"गुढी कशी उभारावी?" त्यासाठीच आम्ही हि सर्व माहिती उपलब्ध करून देणारे संकेत
स्थळ बनवायचे ठरविले आणि गुढीपाडवा.कॉम Gudipadwa.Com ह्या संकल्पनेचा जन्म झाला.
आज महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन होत नाही, त्यामुळे आपल्यातले
बरेच मराठी बांधव त्यांचा आनंद घेऊ शकत नाहीत, त्या सर्व मराठी बांधवाना तसेच
परदेशस्थ मराठी जणांना शोभायात्रांचा आनंद छायचित्रे व चित्रफितींच्या स्वरुपात
लुटूण्यासाठी आम्ही ह्या संकेत स्थळामध्ये गुढीपाडवाच्या संदर्भात छायचित्रे व चित्रफिती उपलब्ध करून देत आहोत.
तसेच, आपल्याकडे गुढीपाडवा बद्दल अधिक माहिती,
छायचित्रे व चित्रफित असल्यास, आपण ती आम्हास आमच्या इमेल वर पाठवू शकता.
आम्ही ती आमच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करू, सोबत तुमचे नाव लिहिण्यास विसरू नका.
आमचा इमेल पत्ता - गुढीपाडवा.कॉम / gudhipadawa@gmail.com
कोणत्याही प्रकारच्या सूचना व प्रतिक्रियेसाठी, इथे संपर्क साधा
आपला नम्र,
अक्षय पिंपळे
संकल्पना विस्तार, प्रकल्प व्यवस्थापक व माहिती संकलन
No comments