Government’s Pension Scheme for Laborers: करोडो कामगारांसाठी लागू असणारी ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ नेमकी काय आहे. आणि या योजनेअंतर्गत किती रुपये पेन्शन दिली जाणार आहे?पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ कशी काम करते?18 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे कोणती, व तसेच आजपर्यंत किती कोटी नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे या सर्व बाबींविषयी माहिती तुम्हाला या लेखामध्ये मिळणार आहे.
Pradhanmantri Shram Yogi Mandhan Yojana Aim:
PM Shram Yogi Mandhan Yojana: आपल्या देशामध्ये असंघटित क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या मजुरांची संख्या करोडोमध्ये आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कामगारांसाठी ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेची भारत सरकार तर्फे सुरुवात करण्यात आली आहे. करोडो कामगारांना आर्थिक आधार देणारी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना वृद्धापकाळात दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. याचा चांगला परिणाम म्हणजेच निवृत्तीनंतर ज्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होण्यास मदत होईल. देशामध्ये असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांची संख्या कोटीमध्ये असून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडे कोणताही उत्पन्नाचा संघटित स्त्रोत नाही. म्हणजेच रोजंदारीवर लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. आणि तसेच दुःखदायक बाब म्हणजेच वयाच्या एका टप्प्यावर या क्षेत्रातील लोकांची कठोर परिश्रम करण्याची क्षमता देखील संपते. आणि अनेक प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन सरकारने पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच कामगारांचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
PMSYM पेन्शन योजना नेमकी कशी काम करते?
ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेले असून असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांसाठी ही योजना लागू आहे या योजनेसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील कामगार अर्ज देखील करू शकता. असंघटित कामगारांमध्ये विविध प्रकारच्या कामांत गुंतलेले लोक समाविष्ट आहेत. हे कामगार मुख्यतः घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, मध्यान्ह भोजन तयार करणारे, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या गोळा करणारे, घरगुती काम करणारे, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर आणि स्वत:च्या व्यवसायात काम करणारे असतात. तसेच, शेतीमधील मजूर, बांधकाम क्षेत्रातील कामगार, विडी कामगार, हातमागाचे कामगार, चामडे कामगार, दृकश्राव्य क्षेत्रात काम करणारे, आणि इतर तत्सम व्यवसायात कार्यरत असलेले कामगारदेखील यामध्ये येतात. देशात एकूण सुमारे 42 कोटी असंघटित कामगार आहेत.
असंघटित क्षेत्र म्हणजे नेमके काय?
PMSYM पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी आहे. असंघटित क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र, जे सरकारकडे नोंदणीकृत नसतात. यामध्ये कामगार, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते, रिक्षाचालक, तसेच घरगुती काम करणाऱ्या महिला यांचा समावेश होतो. असंघटित व संघटित क्षेत्रात कोणकोण येतात, याची संपूर्ण यादी केंद्र सरकारने ई-श्रम पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ अंतर्गत नियमित योगदान केल्यानंतर लाभ कशाप्रकारे दिला जातो?
या योजनेअंतर्गत कामगारांना दरमहा ठराविक रक्कम योगदान करावी लागते, आणि मग सरकार देखील त्याच रकमेचे योगदान करते. उदाहरणार्थ,कामगार दरमहा 200 रुपये जमा करतो, तर सरकारही त्याच प्रमाणे 200 रुपये योगदान करते. या योजनेत 20 वर्षे नियमित योगदान केल्यानंतर, वयाच्या 60 व्या वर्षी कामगारांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळते.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ कशी काम करते?
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सामाजिक सुरक्षा देणे आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील कामगार अर्ज करू शकतात. योजनेअंतर्गत कामगारांनी दरमहा काही ठराविक रक्कम योगदान करावे लागते, ज्यात सरकार देखील तितकीच रक्कम योगदान देते. उदाहरणार्थ, जर कामगाराने दरमहा 200 रुपये जमा केले, तर सरकारही त्याच रकमेचे योगदान देते. या योजनेत 20 वर्षे नियमित योगदान केल्यानंतर, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर कामगारांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे.
PM Shram Yogi Mandhan Scheme अंतर्गत लाभार्थी
सफाई कामगार, लहान आणि मध्यम शेतकरी, पशुपालन करणारे, मासेमारी करणारे (मत्स्यपालक), भूमिहीन शेतकरी, चमड्याचे काम करणारे, भाजी आणि फळ विक्रेते, रिक्षाचालक, पॅकिंग कामगार, स्थलांतरित कामगार (एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी आलेले), घरकाम करणारे, बांधकाम कामगार, वीटभट्टी आणि दगड खाणीतील लेबलिंग आणि पॅकिंग कर्मचारी, विणकाम करणारे, कचरा गोळा करणारे, ओझे वाहणारे, आणि धोबी (वॉशरमन) यांचा समावेश आहे.
नोंदणी प्रक्रिये विषयीची संपूर्ण माहिती:ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कामगारांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी आधार कार्ड आणि बँक तपशील आवश्यक आहेत. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, कामगारांना खाते उघडल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर मिळतो. त्यानंतर, प्रीमियमची रक्कम दरमहा त्याच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाईल, परंतु पहिला हप्ता चेक किंवा रोख स्वरूपात भरावा लागतो.जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर, कामगार https://maandhan.in/ या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करताना नागरिकांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. यासाठीची संपूर्ण सूची खालीलप्रमाणे आहे, त्यामुळे संबंधित कागदपत्रे एकत्रित करणे आवश्यक आहे:
1. ओळखपत्र
2. वयाचे प्रमाणपत्र
3. स्थानिक रहिवासी दाखला
4. श्रम कार्ड
5. आधार कार्ड (बँकेत लिंक केलेले)
6. पॅन कार्ड
7. वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
8. मोबाईल नंबर
9. ई-मेल आयडी
10. पासपोर्ट आकाराचे फोटो
11. बँक खात्याचा पुरावा (पासबुकचा पहिला पान)
CSC सेंटरमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम, आवश्यक कागदपत्रांचे झेरॉक्स तयार करून जवळच्या CSC सेंटरला भेट द्या. तिथे, PMSYM योजनेबद्दल अधिकाऱ्यांना माहिती द्या. अधिकारी तुम्हाला अर्जाचा फॉर्म देतील, ज्यामध्ये आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. फॉर्म पूर्ण झाल्यावर त्यासोबत सर्व कागदपत्रांची झेरॉक्स जोडून CSC सेंटरमध्ये फॉर्म जमा करा. अधिकारी तुम्हाला फॉर्मची प्रिंट देतील, जी भविष्यातील संदर्भासाठी ठेवावी. अशा रीतीने तुम्ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
PM Shram Yogi Mandhan योजना – सेल्फ एनरोलमेंट
या योजनेमध्ये स्वत:ची नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाइट उघडा. वेबसाइटच्या मुख्य पृष्ठावर “Click Here To Apply Now” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, “Self Enrollment” पर्याय निवडा. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून Proceed करा. पुढील टप्प्यात, तुमची वैयक्तिक माहिती जसे नाव, ई-मेल आयडी भरा आणि कॅप्चा कोड टाकून OTP मिळवून व्हेरिफाय करा. फॉर्म उघडल्यानंतर, आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा आणि कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. सबमिट केल्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
PM Shram Yogi Mandhan योजनेचे फायदे:
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारी योजना आहे. ज्यांना नियमित वेतन मिळत नाही अशा कामगारांसाठी निवृत्तीनंतरही आर्थिक आधार मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते. या योजनेत सहभागी झालेल्या लाखो कामगारांना पेन्शन सुविधेमुळे वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळू शकते, ज्यामुळे त्यांची आर्थिक चिंता कमी होते.
या योजनेत दरमहा 55 रुपये इतकी कमी रक्कम भरल्यास, 60 वर्षांच्या वयानंतर लाभार्थ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. ही पेन्शन थेट केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ट्रान्सफर होते. लाभार्थ्यांकडून जसे योगदान केले जाते, त्याच्या बरोबरीने सरकारकडून देखील समान रक्कम जमा केली जाते.
PMSYM योजना ही सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, ज्यामध्ये संपूर्ण आर्थिक सहाय्य केंद्र सरकारद्वारे प्रदान केले जाते. जर लाभार्थ्याचे 60 वर्षांपूर्वी निधन झाले, तर त्यांचा जोडीदार खाते चालू ठेवण्याचा किंवा जमा केलेल्या रकमेचे व्याजासह परतावा घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. अर्ज करणाऱ्याचे वय कमी असेल तर प्रीमियमची रक्कम कमी राहते, तर वय जास्त असल्यास थोडा अधिक प्रीमियम भरावा लागतो.
उदाहरणार्थ, वय 18 असलेल्या व्यक्तींना दरमहा फक्त 55 रुपये जमा करावे लागतात, तर 40 वर्ष वयाच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रतिमाह योगदान करावे लागते. 60 वर्षांनंतर लाभार्थ्याचे निधन झाल्यास त्यांच्या जोडीदाराला पेन्शन रकमेचे 50% दिले जाते. बँकेमध्ये ऑटो-डेबिट कार्यक्षमता सक्रिय करून प्रीमियमची रक्कम दरमहा आपोआप वजा होते, ज्यामुळे प्रीमियम थकण्याची शक्यता टळते आणि दंड आकारला जात नाही.
असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना दरमहा काही प्रमाणात कमी रक्कम जमा करून 60 वर्षांचे झाल्यानंतर केंद्र सरकारकडून निवृत्ती पेन्शन स्वरूपात कमीत कमी 3,000 रुपये मिळतात. PIB च्या माहितीनुसार, 22 जुलै 2024 पर्यंत असंघटित क्षेत्रातील 29.82 कोटी लोकांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी नागरिकांना खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
1. या योजनेमध्ये देशातील असंघटित क्षेत्रातील व्यक्तींना भाग घेण्याची संधी आहे.
2. जर नागरिक National Pension Scheme, Employees State Insurance Corporation Scheme, किंवा Employees Provident Fund Scheme मध्ये भाग घेत असतील, तर त्यांना अर्ज करण्याची परवानगी नाही.
3. तसेच, जो व्यक्ती आयकर भरणारा असेल, त्याचा अर्ज देखील स्वीकारला जाणार नाही.
4. लाभार्थ्यांकडे एक सक्रिय Savings Bank Account असणे अनिवार्य आहे.
5. PMSYM योजनेसाठी नागरिकांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.
6. या योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांचा मासिक पगार 15,000 रुपयांपेक्षा कमी असावा लागतो.
7. अर्ज करणाऱ्यांकडे E Shram Card असणे आवश्यक आहे.
2024 च्या प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजनाची माहिती थोडक्यात
योजनेचे नाव: Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana (PMSYM)
प्रकार: केंद्र सरकारची योजना
सुरूवात: १ फेब्रुवारी, २०१५
लाँच: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते
विभाग: भारत सरकारचा श्रम आणि रोजगार मंत्रालय
उद्दिष्ट: असंघटित क्षेत्रातील नागरिकांना निवृत्तीनंतर पेन्शन सेवा प्रदान करणे
लाभार्थी: भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगार
लाभ: प्रति महिना ३,००० रुपयांची पेन्शन
अर्जाची पद्धत: ऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइट: maandhan.in