Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme big update :
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा अपडेट आला आहे. या योजनेत तब्बल 1 कोटी 96 लाख 43 हजार 207 पात्र महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे. उर्वरित महिलांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे चौथ्या हप्त्याची उत्सुकता वाढली आहे. मात्र काही महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाही. का, कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत, आणि कोणत्या कारणांमुळे त्या अपात्र ठरतील, याची सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
लाडकी बहीण योजनेत तिसऱ्या हप्त्याचे वितरण
योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात 3000 रूपये जमा झाले होते, त्या महिलांना आता 1500 रूपये मिळाले आहेत. तसेच ज्या महिलांना आधी एकही पैसा मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात आता 4500 रूपये जमा झाले आहेत. हा तिसरा हप्ता आता संपला असून, चौथा हप्ता ऑक्टोबर महिन्यात जमा होईल. विशेष म्हणजे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकाच महिन्यात मिळणार असल्याने महिलांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे.
कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही?
काही महिलांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. जर कोणत्याही कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल, तर त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा एकही पैसा मिळणार नाही. हे निकष सरकारने स्पष्ट केले असून, योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजना लागू होणार नाही.
लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र महिला कोण?
1. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
2. कुटुंबातील आयकरदाता सदस्य.
जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असेल, तर त्या कुटुंबातील महिलांना योजना लागू होणार नाही.
3. कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी.
जर कुटुंबातील सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकरी करत असेल किंवा निवृत्तीवेतन घेत असेल, तर ते कुटुंब अपात्र ठरेल. मात्र, रु. 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असणारे कंत्राटी कर्मचारी आणि स्वयंसेवी कामगार पात्र ठरतील.
4. इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला.
जर महिलांना इतर कोणत्याही सरकारी योजनेतून 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम दरमहा मिळत असेल, तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
5. खासदार किंवा आमदार असलेले कुटुंब.
विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार असलेल्या कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
6. केंद्र किंवा राज्य सरकारच्या मंडळाचे सदस्य.
ज्या कुटुंबातील सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असतील, त्या महिलांना योजना लागू होणार नाही.
7. चारचाकी वाहन असलेले कुटुंब.
ज्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे, त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांसाठी चेतावणी
वरील पात्रता निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनी जर चुकून या योजनेसाठी अर्ज करून पैसे घेतले असतील, तर त्यांना हे पैसे सरकारला परत करावे लागतील. सरकार या प्रकरणांची चौकशी करून अपात्र महिलांवर कारवाई करणार आहे. त्यामुळे ज्यांनी अर्ज करताना अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांनी आपले पैसे परत करण्याची तयारी ठेवावी.
निष्कर्ष
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मदत करणारी योजना आहे. मात्र, सरकारने ठरवलेल्या निकषांनुसार काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ घेण्यापूर्वी पात्रता निकष तपासून अर्ज केलेला असणे आवश्यक आहे, अन्यथा चुकून घेतलेले पैसे परत करावे लागतील.
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.
हे पण वाचा👇🏻
🪀⭕महिला सन्मान बचत प्रमाणपत्र:₹2,00,000 गुंतवणुकीवर मिळवा ₹32,000 व्याज! जाणून घ्या कसे!
🪀18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वितरण सुरु नवीन यादया जाहीर.🌿
🪀“या” योजनेला 20 लाख शेतकऱ्यांनी दिली पसंती! ही नवीन योजना नेमकी कोणती आहे.😃