महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) मेगाभरती
एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांचे उमेदवार बराच काळ जाहिरातीची वाट बघत होते. अखेर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गट-ब आणि गट-क सेवा २०२४ च्या संयुक्त परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
मराठा आरक्षणाचा परिणाम आणि पदांवरील बदल
मराठा आरक्षणामुळे जाहिरातीमध्ये बदल करण्यात आले असून, शासनाकडून अद्याप सुधारित मागणीपत्र एमपीएससीकडे आले नव्हते. यामुळेच संयुक्त परीक्षेची जाहिरात काही काळ रखडली होती. विशेष म्हणजे, पोलिस उपनिरीक्षक पदाचे मागणीपत्र अजूनही आले नाही, त्यामुळे या पदासाठी जाहिरात उशीराने आली आहे. मात्र, गट-ब मधील ४८० आणि गट-क मधील १३३३ पदांसाठी अखेर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ज्यामुळे परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.
विद्यार्थ्यांची मागणी आणि अपेक्षा
राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा ही एमपीएससीकडून दरवर्षी घेतली जाते. मागील वर्षी तब्बल ७,००० पदांसाठी जाहिरात निघाली होती आणि एप्रिल २०२३ मध्ये परीक्षाही झाली होती. यावर्षीही ८,००० पेक्षा अधिक पदांसाठी जाहिरात येईल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. अनेक विद्यार्थी पुणे, मुंबई आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये तयारी करत होते आणि आर्थिक भार देखील सहन करत होते. त्यामुळे आचारसंहितेच्या आधीच जाहिरात निघावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.
गट-ब परीक्षेची पदे आणि त्यांची संख्या
महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. यामध्ये ४८० पदांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २१६ जागा आहेत. सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ५४ जागा तर राज्य कर निरीक्षक पदासाठी २०९ जागा उपलब्ध आहेत.
गट-क सेवा २०२४ मधील पदे आणि तपशील
गट-क साठी एकूण १३३३ पदांची जाहिरात आली आहे. यामध्ये प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:
उद्योग निरीक्षक: ३९ जागा
कर सहायक: ४८२ जागा
तांत्रिक सहायक: ९ जागा
लिपिक: १७ जागा
लिपिक-टंकलेखक: ७८६ जागा
या गट-क पदांसाठी परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतली जाईल.
अर्ज भरण्याच्या प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
एमपीएससीच्या या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ४ नोव्हेंबर आहे. शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया ४ नोव्हेंबरपर्यंत खुली असेल. चालानद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख ७ नोव्हेंबर आहे.
हे पण वाचा👇🏻👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🪀📣तुमच्या मुलीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये!जाणून घ्या संपूर्ण माहिती!
🪀📣माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा, पण काही महिलांना मिळणार नाही एकही पैसा – का?”
🪀🏦सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! SBI बँकेत 1511 पदे रिक्त, अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ📣