Mahila Samman Savings Certificate: सर्वांसाठी एक आनंदाची बातमी पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेमुळे जास्त जास्त दोन वर्षांसाठी गुंतवणूक करता येणार आहे. तर ही योजना कोणती आहे याविषयीच्या माहितीवर आपण या लेखामध्ये चर्चा करणार आहोत.
महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकार विविध योजना चालवत असते आणि याच योजनांमधील एक योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Savings Certificate). मित्र-मैत्रिणींनो ही एक डिपॉझिट योजना आहे जी खास महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना दोन वर्षांची असून या योजनेवर 7.5% दराने व्याज मिळते. म्हणजेच या योजनेसाठी जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी पैसे जमा करता येतात.
गुंतवणुकीची संधी फक्त मार्च 2025 पर्यंतच उपलब्ध:
तुम्हाला जर या योजनेसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नी,मुलगी किंवा आईच्या नावाने या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता आणि चांगला व्याजदर मिळवू शकता. या योजनेमध्ये गुंतवणुकीची संधी फक्त मार्च 2025 पर्यंतच उपलब्ध असणार आहे.
₹32,000 व्याज मिळवण्यासाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल?
MSSC Calculator च्या माहितीनुसार, जर तुम्ही घरातील कोणत्याही महिलेसाठी ₹2,00,000 गुंतवले, तर 7.5% व्याजदरामुळे तुम्हाला ₹32,044 व्याज मिळेल. या गुंतवणुकीनंतर दोन वर्षांनी परतफेडीची एकूण रक्कम ₹2,32,044 होईल.
जर तुम्ही ₹1,50,000 गुंतवले, तर दोन वर्षांच्या अखेरीस तुम्हाला ₹1,74,033 मिळतील, ज्यामध्ये ₹24,033 व्याज असेल.
तुम्ही ₹1,00,000 गुंतवल्यास, 7.5% व्याजदरानुसार परतफेडीच्या वेळी तुम्हाला ₹1,16,022 मिळतील.
आणि जर तुम्ही ₹50,000 गुंतवले, तर तुम्हाला दोन वर्षांत ₹8,011 व्याज मिळेल, ज्यामुळे परतफेडीची एकूण रक्कम ₹58,011 होईल.
The Mahila Samman Savings (FAQs):
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र म्हणजे काय?
हे एक डिपॉजिट योजना आहे जी खास महिलांसाठी तयार केली आहे, ज्यात 7.5% व्याजदर मिळतो.
या योजनेत गुंतवणूक किती काळासाठी करता येईल?
या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणत्या महिलांचे नाव वापरता येईल?
तुम्ही तुमच्या पत्नी, मुलगी किंवा आईच्या नावाने गुंतवणूक करू शकता.
या योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख काय आहे?
या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहे.
या योजनेत गुंतवणुकीवर मिळणारे व्याज कसे आहे?
या योजनेवर 7.5% व्याज मिळते, ज्यामुळे तुम्हाला चांगला परतावा मिळतो.
₹32,000 व्याज मिळवण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?
MSSC Calculator नुसार, ₹2,00,000 गुंतवल्यास ₹32,044 व्याज मिळेल.
खाते कसे उघडावे?
तुमच्यासाठी खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडावे लागेल. त्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो आवश्यक आहेत.
या योजनेत वयाचे कोणतेही बंधन आहे का?
नाही, या योजनेत वयाचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही वयाच्या महिला किंवा मुलींच्या नावाने गुंतवणूक करता येते.
आंशिक रक्कम काढण्याची सुविधा कधी उपलब्ध आहे?
एक वर्षानंतर तुम्हाला 40% रक्कम काढण्याची सुविधा मिळते.
जर मी ₹2,00,000 गुंतवले, तर एक वर्षानंतर किती रक्कम काढता येईल?
जर तुम्ही ₹2,00,000 गुंतवले, तर एक वर्षानंतर तुम्ही ₹80,000 काढू शकता.