Ladki Bahin Yojana 3rd Installment Update In Marathi :मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि 2024- 25 च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा देखील करण्यात आली आणि सरकारने काहीच दिवसांमध्ये ही योजना अमलात आणून लाखो महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे आणि आतापर्यंत सरकारकडे दोन कोटी पेक्षा अधिक महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहे.
मित्रांनो लाखो महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये महिलांच्या खात्यात जमा केले परंतु अनेक महिला ज्यांचे अर्ज मंजूर असताना देखील या योजनेचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत आणि नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता अद्याप मिळालेला नाही अशा सर्व महिलांना या योजनेचे पैसे कधी मिळतील याविषयी महिलांना प्रश्न पडला आहे. आणि तसेच काय करावे लागेल जेणेकरून या योजनेचा लाभ घेता येईल यासंबंधी सरकारने काही निर्देश दिलेले आहेत ते खालील प्रमाणे असून सर्वांनी ते काळजीपूर्वक वाचा.
लडकी पण योजनेचा तिसरा हप्ता :
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले आहेत आणि आता महिलांना प्रश्न पडला आहे की पुढचा पत्ता केव्हा मिळणार? म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची महिलांना प्रतीक्षा आहे. मित्रांनो सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून तिसरा हप्ता वितरित करायला सुरुवात केलेली आहे आणि अनेक महिलांना 25 सप्टेंबर 2024 पासून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या उर्वरित महिलांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्यात किती पैसे मिळाले?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केली असून ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये देण्यात आले अशा सर्व महिलांच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्यात पुन्हा दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि ज्या महिलांना अर्ज मंजूर असतानाही एकही रुपया मिळालेला नव्हता अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा झालेले आहेत.
जर तुमचे अर्ज मंजूर झालेले असूनही पैसे मिळाले नाहीत तर. ..
अशा सर्व महिलांनी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नवीन खाते उघडून घ्यावे आणि त्या कर्मचारी यांना सांगून खाते आधार लिंक करून घ्यावे.
Ladki Bahin Yojana Important Link