कापूस निगम ( Cotton Corporation of india ltd recruitment for office staff )महामंडळाच्या अंतर्गत कार्यालयीन आणि फिल्ड कर्मचारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. कार्यालयीन स्टाफ (खाते विभाग) आणि (जनरल विभाग) साठी 25,500 रुपयांचे वेतनमान असून फिल्ड स्टाफसाठी 37,000 रुपयांचे वेतनमान ठरवण्यात आले आहे.
कोणत्याही शाखेतून 50% गुण आवश्यक:
उमेदवारांची शैक्षणिक पात्रता लक्षात घेता, बी.कॉम पदवीधरांना खाते विभागासाठी 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जनरल विभागासाठी कोणत्याही शाखेतून 50% गुण आवश्यक आहेत. तसेच, फिल्ड स्टाफसाठी बी.एस्सी (कृषी) पदवी आवश्यक आहे. मागास आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45% गुणांची सवलत देण्यात येत आहे.
10 लाख जनतेबरोबर तुम्हीदेखील अशाच अपडेट्ससाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम चॅनेलला लवकरात लवकर जॉईन व्हा!!
मुलाखतीद्वारे निवड:
मुलाखतीची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यात होणार असून, 7 ऑक्टोबर 2024 रोजी कार्यालयीन स्टाफसाठी आणि 8 ऑक्टोबर 2024 रोजी फिल्ड स्टाफसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी बठिंडाच्या कापूस निगम महामंडळाच्या मुख्य कार्यालयात हजर राहावे लागेल. अधिक माहितीसाठी आणि जाहिरातीसाठी अधिकृत लिंकवर उपलब्ध माहितीनुसार उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अ.क्र पदनाम मुलाखत दिनांक
01. कार्यालयीन स्टाफ ( खाते ) 07.10.2024
02. कार्यालयीन स्टाफ ( जनरल ) 07.10.2024
03. फिल्ड स्टाफ 08.10.2024
🟡पुणे पोलीस भरतीसाठी अर्ज करायची फक्त तीन दिवस शिल्लक,आजच अर्ज करा🟡
🟡‼️महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती सुरु‼️🟡